शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन | chhatrapati shivaji maharaj jayanti speech in marathi
आजच्या या लेखात आपण शिवजयंती चे शिवाजी महाराज भाषण मराठी व shivaji maharaj speech in marathi मिळवणार आहोत. या शिवाजी महाराज मराठी भाषणाला आपण 19 फेब्रुवारी शिवजयंती च्या कार्यक्रमात वापरू शकतात. तर चला सुरू करू.
Shivaji maharaj speech in Marathi: मित्रानो आपल्या महाराष्ट्रातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते. शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जवाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले.
शिवाजी महाराज भाषण मराठी 2024 - Shivaji maharaj speech in Marathi
आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींना.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.आजचे राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीच्या वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरलेले आहे. आजचे रजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मतांची भीक मागत फिरत आहेत.
मावळ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखे वरून वाद पेटवला जातो, जाती-धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवले जाते, ही लाजिरवाणी बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.
जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाई जिंकण्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे.
इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाताजाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्तानच्या चेहरा पाहता आला नसता.. असे होते आमचे रयतेचे राजा छत्रपती शिवराय.!
आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टींचे चिंतन करावे. केवळ दाढीमिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर हवा. मावळ्यांनो आज गरज आहे हे समजून घेण्याची कि मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय शिवाजी महाराज भाषण
तर मित्रहो Majhi Shala Varti हे होते शिवरायांच्या जीवनावर लिहिलेले शिवाजी महाराज भाषण मराठी व Shivaji maharaj speech in Marathi. आशा करतो की तुम्हाला shivaji maharaj bhashan marathi हे भाषण आवडले असेल ह्या भाषणाला आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.
Social Plugin